बीड (रिपोर्टर): अर्धा पावसाळा संपलाय; मात्र, मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ 16 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंतेची परिस्थिती आहे. बहुतेक मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे किंवा ही धरणे कोरडी आहेत. मोठ्या प्रकल्पांत गतवर्षी आजच्या तारखेला 35.17 टक्के पाणीसाठा होता.
मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत 2022 सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे 90 मध्यम प्रकल्प आणि 750 लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत 2022 सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे 90 मध्यम प्रकल्प आणि 750 लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत.
तीन प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागाकडेही मुसळधार पावसाने पाठ फिरवल्याने जायकवाडी प्रकल्पात आजच्या दिवशी केवळ 4.3 टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात 27.65 टक्के पाणीसाठा होता. सीना कोळेगाव, मांजरा आणि माजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पावर जवळची शहरे आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. तेथे धरणांतील मृत साठ्यातून पाणीपुरवठा होत आहे.
धरण आजचा जलसाठा आणि गतवर्षीची स्थिती
जायकवाडी – 4.3 टक्के —- 27.65 टक्के
निम्न दुधना – 6.40 टक्के ——- 27.38 टक्के
येलदरी – 30.8 टक्के —— 57.88 टक्के
सिद्धेश्वर – 5.66 टक्के —— 9.87 टक्के
पेनगंगा – 40 टक्के ——— 48.80 टक्के
मानार – 27.36 टक्के ——– 35.6 टक्के
निम्न तेरणा – 25 टक्के ——- 27.60 टक्के
विष्णुपुरी – 70 टक्के —– 53.61 टक्के
माजलगाव – 00 —— 16.28 टक्के
मांजरा — 00 —– 23.24 टक्के
सीना कोळेगाव – 00 —- उणे 14 टक्के
मराठवाड्यात आजवर 52 टक्के पाऊस