लोकांच्या जिविताशी खेळणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात
आष्टी (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध जात असल्याची ओरड सातत्याने होत होती. आष्टी तालुक्यामध्ये दूध भेसळ होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा प्रशासनाला झाल्यानंतर थेट जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या प्रकरणात लक्ष घातले. खबर्या मार्फत आलेल्या माहितीच्या आधारे भेसळयुक्त दूध निर्मितीसाठी वापरण्यात येणार्या पावडरचा साठा एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचे समजल्यानंतर पहाटेच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी सदरच्या गोडाऊनवर छापा टाकत तब्बल 600 गोण्या पावडर जप्त केले. याची बाजारात ……….. रुपये एवढी किंमत आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई ही बीड – नगर महामार्गावरील टाकळी अमिया फाट्या जवळ करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील टाकळी अमिया रोड लगत दुकान असून लगेच पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे.खब-याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न प्रशासन व आष्टी पोलिसांनी रविवारी पाहटे धाड टाकली या गोडाऊन ची पाहणी केली असता याठिकाणी भेसळयुक्त दुधाचे निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणार्या पावडरचा मोठा साठा आढळून आला आहे . हा साठा जप्त करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे, अनुराधा भोसले,सहाय्यक आयुक्त कांबळे,आष्टीचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,पोलीस हवालदार बबुशा काळे,पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव,अमलदार मजरुद्दीन सय्यद,सचिन गायकवाड,सचिन पवळ,दीपक भोजे, महिला आमदार जिजाबाई आरेकर,अर्चना आरडे यांनी केली असून त्यांच्याकडून अन्न औषधचे अधिकारी माहिती घेत होते. या दुधाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.सॅम्पल कलेक्ट करण्याचे काम सुरू आहे.गुन्हा दाखल करण्यासाची प्रक्रिया सुरू आहे. सदरची घटना गंभीर आणि लोकांच्या जीवितास हाणी पोहचविणारी असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली.