बीड (रिपोर्टर): लोकनेते विनायकराव मेटे यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण या निमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी दिवंगत विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले अनेकांना आपल्या अश्रूचेबांध आवरता आले नाही. यावेळी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील पार पडला.
14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईला जात असताना मुंबई- पुणे महामार्गावर लोकनेते विनायकराव मेटे यांच्या गाडीला अपघात होऊन त्यात त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेने बीड जिल्हाच न्हवे तर अख्या महाराष्ट्रावर शोककाळा पसरली होती. राजेगाव सारख्या एका खेड्यात जन्म घेऊन ते सलग पाच वेळा विधानपरिषद सदस्य अशी कारकीर्द असणार्या लोकनेत्याचे असे अकाली जाण्याने विस्थापितांची मोठी हानी झाली आहे. आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये विस्थापिता करिता काम करण्याची धडपड आणि त्यांना राजकारण आणि समाजकारण यात संधी देत प्रस्थापितांच्या बरोबरीने पुढे आणणारे असे स्व.मेटे साहेब यांचे नेतृत्व होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक माणसे उभे केले त्यांना आधार दिला शिवसंग्राम च्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण केले आणि शोषित वंचित पीडीताना न्याय देण्याचा काम केले. अशा या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या तमाम जनसामान्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते.