बीड (रिपोर्टर): चाळीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकांवर काल पेठ बीड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील माऊली चौक, कश्मिरापेठ भागात राहणारे 62 वर्षय व्यावसायिक रमेश पुसाराम कासट यांचे कुटे यांच्या ज्ञानराधामध्ये 15 एफडी असून त्यामध्ये 17 लाख 47 हजार 609 रुपये आहेत. ते देण्यास टाळाटाळ केली जाते. म्हणून सुरेश कुटेंसह 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेट प्रकरणी गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण आता अधिकतेने वाढले आहेत. 40 पेक्षा अधिक गुन्हे सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर आहेत. आतापर्यंत शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचे अधिकृत गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे दोन हजार कोटींपेक्षा अधिक रुपयाचां हा घोटाळा असून काल कश्मिरापेठ माऊली चौक येथील व्यवसायिक रमेश पुसाराम कासट यांनी तक्रार दिली. ‘तुमचे पैसे आमच्या बँकेत सुरक्षीत ठेवू, त्यावर जास्तीत जास्त व्याज देऊ’ त्यामुळे कासट यांच्या चार एफडी तर त्यांच्या मुलाच्या अकरा एफडी बँकेत ठवेण्यात आल्या. सुमारे 17 लाख 47 हजार 609 रुपयांचे एफडी ठेवण्यात आल्या असून हे पैसे देण्यास आता बँक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे चेअरमन सुरेश कुटे, व्यवस्थापक यशवंत कुलकर्णी, जनरल मॅनेजर नारायण शिंदे, सुशील हाडुळे, श्रीकांत आमटे, अर्चना कुटे, वसंत सटाले, आशिष पाटोदकर, दादाराव उंदरे, कैलास मोहिते, शिवाजी पासनकर, रविंद्र तलवे, आशा पाटील, रेखा सटाले, रघुनाथ खरसाडे, रविंद्र यादव, वैभव कुलकर्णी, संदीप भुसारी या अठरा जणांवर पेठ बीड पोलिसात गु.र.नं. 213/24 कलम 420, 406, 409, 120, ब 34 भा.दं.वि.सह कलम 3 व 4 महाराष्ट्र वित्तीय संस्थांमधील हितसंबंधीचे संरक्षण अंतर्गत कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.