शेतकर्यांची तहसिलदारांकडे धाव; कारवाईची मागणी
केज, (रिपोर्टर)ः-पवनचक्कयाचे पार्ट (सामान) घेवून जाण्यासाठी अक्षय ऊर्जा (आवादा) कंपनीने शेतकर्यांची कुठलीही परवानगी न घेता शेतकर्यांच्या शेतातून रस्ता तयार करण्यात आला. यामध्ये संबंधित शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांनी तहसिलदार यांच्याकडे केली. कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून कंपनीने रस्ता बनवल्याचा आरोप शेतकर्यांकडून करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील विडा येथील सर्व्हे नं.35, 536 सह आदी शिवारातून अक्षय ऊर्जा (आवादा) कंपनीने पवनचक्कीचे पार्ट (सामान) घेवून जाण्यासाठी शेतकर्यांच्या शेतातूनच रस्ता तयार केला.यामध्ये शेतकर्यांचे पिक खोदून काढण्यात आले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांची परवानगी न घेता रस्ता तयार करण्यात आला असुन या कंपनीच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी अभय कुलकर्णी, सुजित विडेकर, सुधीर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, कृष्णा देशमुख, संजय पारवे सह आदींनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला.