बीड (रिपोर्टर): मराठवाड्यातील धरणं पुर्णत: भरलेले नाहीत. हे धरणे भरण्यासाठी दोन-चार मुसळधार पाऊस पडणे गरजेचे आहे. जायकवाडीच्या वरच्या बाजुला मुसळधार पाऊस पडल्याने जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची आवक सुरू आहे. आजस्थितीत या धरणात 33 टक्के पाण्याचा साठा जमा झाला तर केज तालुक्यातील मांजरा धरणातही 18 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे. मरठवाड्यातील इतर धरणात मात्र आजही समाधानकारक पाण्याचा साठा झाला नसल्याने आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी धरणात पाणीसाठा जमा होणे गरजेचे आहे.
राज्यात आतापर्यंत चांगला पाऊस पडला असला तरी मराठवाड्यात मात्र कमीच पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पूस पडला त्यामुळे त्या परिसरातील जवळपास सर्व धरणे पुर्णत: भरले. जायकवाडी धरणावर अनेक शहरे आणि गावे अवलंबून आहेत. तसेच शेतीसाठीही या धरणातून पाणी सोहले जाते. धरणाच्या वरच्या भागात पाऊस पडल्यामुळे या धरणात सध्या पाण्याची आवक होत आहे. आतापर्यंत जायकवाडीत 33 टक्के पाण्याचा साठा जमा झाला. हा साठा पिण्यासाठी पुरे ठरतो, शेतीसाठी पाणी सोडण्याकरिता आणखी पाणीसाठा या धरणात जमा होणे गरजेचे आहे. तसेच केज तालुक्यातील मांजरा धरण हे मे महिन्यात मृत साठ्यात होते. धरण परिसरात पाऊस पडल्याने या धरणातही पाण्याची आवक वाढली. सदरील धरणात 18 यक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पिण्याच्या पाण्याची सोय या अठरा टक्के साठ्यावर होऊ शकते मात्र शेतीसाठी इतक्या पाण्याच्या साठ्यावर पाणी सोडणे शक्य नाही. आणखी पाणी साठ्याची गरज आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणार्या माजलगाव धरणात मात्र पाणीसाठा जमा झाला नाही. इतरही काही धरणात पाणी जमा झालेले नाही. आगामी काळात चांगला पाऊस झाला तरच मराठवाड्यातील धरणे पुर्णत: भरू शकतात.