बीड, (रिपोर्टर)ः- कृषी विभागाच्या महा डीबीटी वेबसाईटवर शेतकर्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावा लागतो. मात्र गेल्या काही दिवसापासून ही वेबासाईट चालेना. फवारणी पंपासाठी शेतकरी अर्ज करण्यासाठी अनेक ग्राहक सेवा केंद्रामध्ये जातात पण त्या ठिकाणी वेबसाईट चालत नाही, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट केली होती. मात्र तरीही त्याचा फायदा झाला नाही. आता आणखी तारीख वाढवून द्यावी अशी मागणी शेकर्यांकडून केली जावू लागली.
शेतकर्यांना अवजारे कृषी विभागकडून मिळतात त्यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज भरावे लागतात. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकरी कापूस, सोयाबीन यासह इतर पिकांना फवारणी करतात. जे शेतकरी आर्थिक दृष्टया कमकूवत आहेत. अशा शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येतो. 100 टक्के अनुदानावर फवारणी पंप मिळतो त्यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 14 ऑगस्ट होती. त्यानंतर 26 ऑगस्ट पर्यंत तारीख वाढविण्यात आली तरीही वेबासाईट व्यवस्थीत चालत नाही. सध्या लाडक्या बहिण योजनेचे फॉर्म भरले जात असल्यामुळे डीबीटीची वेबसाईट चालत नाही. फॉर्म दाखल करण्याची अनेकांची इच्छा आहे. पण वेबसाईट चालत नसल्याने आणखी तारीख वाढून देण्याची मागणी शेतकर्यांतून केली जात आहे.
सर्वरला प्रॉब्लम आहे-गंडे
सर्वर का चालत नाही याबाबत तालुका कृषी अधिकारी ाळासाहे गंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, लाडकी बहिण योजना, आधार लिंक सुरू असल्याने आपल्या सर्वरला प्रॉब्लेम आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बाबत आपण वरिष्ठांना पत्र व्यवहार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.