बीड (रिपोर्टर): नजीकच्या काळात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती महोत्सव, गौरी-गणपती उत्सव हे सण येत आहेत. या काळामध्ये कोणीही समाजविघातक, समाज माध्यमावर पोस्ट करू नयेत, अशा पोस्ट केलेल्या आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना वजा इशारा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी केल्या आहेत. काल त्यांनी शांतता समितीची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, ईद-ए-मिलाद समितीचे सदस्य सहभागी झाले हातेे. बारगळ पुढे म्हणाले की, समाजातील सर्व लोकांनी आपआपले सणोत्सव शांततेत पार पाडावेत, सामाजिक सलोखा बिघडेल अशा कोणत्याही पोस्ट करू नयेत. शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये प्रत्येक एरिआसाठी एक बिटअंमलदार नियुक्त केला आहे. हा बिटअंमलदारच त्या एरिआचा सुरक्षारक्षक म्हणून काम करेल आणि ठाणेप्रमुक व गणपती मंडळ यांचा तो समन्वयक म्हणूनही काम करेल. या कालात ठाणे अंमलदारांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडायचे आहेत. कुठे काही अनुचीत प्रकार घडत असेल तर त्याची माहिती तात्काळ आपल्या ठाणेप्रमुखाला द्यघावी. तसेच गणपती उत्सवाच्या काळामध्ये उत्कृष्ट सामाजिक ऐक्य राहील, असे समाजोमिमुख गणेश उत्सव राबवणार्या गणेश मंडळाला बक्षिस आणि ट्रॉफी देण्यात येईल, असेही बारगळ यांनी सांगितले. सोबतच सर्व गणेश मंडळांना महिला सुरक्षा ट्रॅफिक नियमन परवाने देण्यात येतील. या बैठकीला शांतता कमिटीच्या सदस्यांसह अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोलडे, पेठबीड पोलीस ठाण्याचे मुदीराज, शिवाजी ठाण्याचे खेडकर, ग्रामीण ठाण्याचे शिवाजी बंटेवार, शहर पोलीस ठाण्याचे शीतलकुमार बल्लाळ उपस्थित होते.