परळी (रिपोर्टर): परळी तेलगाव मार्गे बीड जाणार्या राज्य रस्त्यावरील तालुक्यातील पुन्हा एकदा बंद झाली पांगरी नजीकचा पर्यायी पूल वाहून गेल्याने हा रस्ता बंद झाला असून रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. सदर रस्त्यावरील वाहतूक शिरसाळा मोहा नागापूर मार्गे वळवण्यात आली आहे. परळी ते दौनापुर राज्य रस्ता हुन पाणी वाहून जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सध्या परळी ते सिरसाळा चौपदरी राज्य रस्त्याचे काम सुरू आहे ह्या रस्त्यावरील पुलाचे काम देखील चालू आहे पुलाचे काम चालू असल्याने ठिकठिकाणी पर्यायी रस्ते बनवण्यात आले आहेत. अशाच प्रकारे परळी तालुक्यातील परळी- तेलगाव बीड मार्गावरील पांगरी या ठिकाणी वाण नदीवर पर्यायी पूल बनवण्यात आला होता मात्र दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने वाण नदीस पूर आला आणि काल रात्री बनवण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेला. पुल वाहून गेल्याने परळीहून तेलगाव मार्गे बीड कडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. बीड कडून परळी कडे येणारी वाहने सिरसाळा या ठिकाणाहून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.