————————————
तालुक्यातील सर्वच मंडळात जोरदार पाऊस नदी नाले तुडुंब ; राजापूरचा संपर्क तुटला
————————–
गेवराई (रिपोर्टर) गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहु लागले असून गोदा पात्र दुथडी वाहू लागल्याने राजापूर गावाला पाण्याचा वेडा पडला असून या ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. याबाबत प्रशासनाकडून गोदाकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याचे नायब तहसीलदार सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान आज दि. 02 सप्टेंबर रोजी आपेगाव उच्च पातळी बंधारा 100% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणार्या पावसाच्या पाण्याची आवक बघता वेळ 11:40 वाजता बंधार्याचे एक दार उघडून गोदावरी नदी पात्रात 7225 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून येणार्या पाण्याच्या आवक नुसार सोडण्यात येणार्या विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते. तरी सदर कालावधीत कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. 1 च्या वतीने महसूल प्रशासनाला देण्यात आली असून याच धर्तीवर गेवराई महसूल प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील गोदकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार सोनवणे यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली असून दुथडी वाहत आसून राजपूर येथील घाट पाण्याखाली गेला असून महादेव मंदिराला पाणी लागले असून राजापूर फाटा ते गाव या रस्त्यावरील कापशी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. याबाबत प्रशासन वेळोवेळी सतर्क असून गोदाकाठच्या गावात तळ ठोकून आहे.