बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातल्या सर्वचे सर्व 61 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून शंभर मि.मी.पेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यातल्या 35 महसूल मंडळात झाला आहे. तर गेवराईच्या रेवकी, माजलगावच्या गंगामसला आणि परळीच्या सिरसाळा महसूल मंडळात 150 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे.
शुन्यावर असलेले माजलगावचे धरण 20 टक्क्यांवर गेले असून नाथसागरातून 35 हजार क्युसेसने पाणी धरणात येत आहे. तर इकडे गोदावरीला पूर आला असून गंगामसला येथील मोरेश्वराचे पुरातन मंदिर पुर्णत: पाण्यात गेले आहे. माजलगावच्या घळाटी नदीला पूर आल्याने घळाटवाडीचा संपर्क तुटला आहे. तर माजलगावच्या गोदाकाठच्या महातपुरी गावात पाणी शिरल्याने गावकर्यांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून येत आहे. शिंदेवाडी नदीला पुर आल्यामुळे नदीवरचा पुल वाहून गेला आहे. तालखेड येथेही एक पुल वाहून गेल्याची घटना समोर येत असून गेवराई तालुक्यातही गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिरळपुरीतील उच्च पातळी बंधार्यातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राजापूरचा घाट पाण्णयाखाली गेला असल्याने या भागातही काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर इकडे बीडमध्ये बिंदुसरा काटोकाट भरले आहे. इकडे करपरा नदीच्या वाहत्या पाण्यात एक मृतदेह आढळून आला आहे.
अतिवृष्टी झालेले महसूल मंडळ खालील प्रमाणे
तालुका बीड मंडळ बीड 119.5 mm पाली 103.8 mm म.जवळा 130.3mm नाळवंडी 108.0mm राजुरी 80.8mm पिंपळनेर 112.3 mm पेंडगाव 116.8mm मांजरसुंबा 70.0mm चौसाळा 75.8mm नेकनूर 72.8mm लिंबागणेश 66.5mm येळमघाट 69.8mm च-हाटा 80.8mm पारगाव शिरस 80.8 mm कुर्ला 130.3mm पाटोदा तालुका दासखेड 66.5 mm गेवराई तालुका गेवराई 124 .0mm मादळमोही 116.3mm जातेगाव 140.5mm धोडराई 147.5mm पाचेगाव 91.3mm उमापूर 131.0 mm चकलांबा 90.0mm शिरसदेवी 118.0mm रेवकी 171.5 mm तलवाडा 130.3mm माजलगाव तालुका माजलगाव 106.0mm गंगामसला 171.0mm किटी आडगाव 135.0mm तालखेड १३३.८ mm नित्रुड ९७.५ mm दिंद्रुड 127.5mm अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई 81.3 mm पाटोदा 78.5 mm लोखंडी 72.3 mm घाटनांदुर 82.3mm बर्दापूर 85.0mm राडी 120 .mm केज तालुका केज 113.0mm युसुफ वडगाव १०७.५mm होळ ११३.३ mm विडा 82.0mm बनसारोळा 100.3mm नांदुरघाट 82.3mm चिंचोली माळी 116.5 mm परळी तालुका परळी 105.5 mm नागापूर 113 .0mm शिरसाळा 155.3 mm पिंपळगाव 112.3mm धारूर तालुका धारूर 132.5 mm मोहखेड 97.5 mm तेलगाव 97.5 mm वडवणी तालुका वडवणी 105.8mm कवडगाव 110 .0mm शिरूर कासार शिरूर 78.3mm रायमोह 88.3mm तिंतरवणी 82.8mm ब्र.येळम 102.8 mm गोमळवाडा 67.8 mm खालापुरी 88.3mm