किल्ले धारूर (रिपोर्टर): धारूर आगारातील एसटी कर्मचार्यांनी पगार वाढ करावी, एसटीचे खाजगीकरण थांबवावे या मागण्यांसाठी आज संप पुकारला आहे या संपामध्ये सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाने ठरल्याप्रमाणे आमची पगार वाढ करावी एसटी कर्मचारी अल्पपगारामध्ये काम करत आहेत .गेल्या संपावेळी मागण्या मान्य केले होत्या परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही त्याची अंमलबजावणी करावी ,पगारवाढ करावी एसटीच्या खाजगीकरणाचा सुरू असलेला प्रयत्न थांबवावा एसटीचे खाजगीकरण करू नये अशा विविध मागण्यासाठी आज धारूर आगारातील कर्मचारी ,चालक ,वाहक व इतर कर्मचार्यांनी संप पुकारला आहे काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे, मुंबई ,नागपूर ,सोलापूर, अहमदनगर अशा विविध ठिकाणी जाणार्या गाड्या आज जाऊ शकल्या नाहीत . केवळ अंबाजोगाई ,बीड याकडे जाणार्या 9 गाड्या सुरू होत्या. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला प्रवासी बस स्थानकावर येऊन वाट पाहून त्यांना घरी परतावे लागले. एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करून सर्वसामान्यांनी प्रवास पुन्हा एकदा सुरू करावा अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.