जायकवाडीच्या धरणातून आज दुपारी पाणी सोडले
गोदावरी नदी पात्रात कोणीही प्रवेश करू नये
गेवराई (रिपोर्टर): नाथसागर 97 टक्के भरल्याने या धरणातून आज दुपारी 12 वाजता पाणी सोडण्यात आले आहे. धरणात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले.
नाथसागराच्या वरच्या बाजुला मुसळधार पाऊस पडल्यामुळे या धरणात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. हे धरण 97.30 टक्क्याने भरले आहे. धरण भरल्याने धरणातून आज दुपारी बारा वाजता पाणी सोडण्यात आले. 3144 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीत पाणी सोडल्यामुळे नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसेच नदीकाठच्या गावकर्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.