बीड (रिपोर्टर)- वैजाळा येथील जवानावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान जवानाचा मृत्यू झाला. आज सकाळी वैजाळा येथे शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तहसीलदारांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
रामहरी खुळे (रा. वैजाळा) हे सैन्यामध्ये कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी जवानाचा पार्थीवदेह वैजाळा येथे आणण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पाटोद्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षकांनी श्रध्दांजली अर्पण केली. बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे पदाधिकारी राख, अंकुश खोटे यांच्यासह आदींनी त्यांना मानवंदना देऊन श्रध्दांजली अर्पण केली. या अंत्यसंस्काराला अनेकांची उपस्थिती होती.