माजलगांव( रिपोर्टर ):- माजलगांवात मध्ये लहुजी विरोद्री सेनेचा वतीने जगविख्यात साहित्यिक , साहित्यरत्न महामानव डॉ.आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या या मागण्यासाठी दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन माजलगांव शहरातील वसंतराव नाईक (परभणी फाटा )येथे दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

जगत विख्यात साहित्य सम्राट लोकशाहिर महामानव डॉ. अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, जगत विख्यात साहित्य सम्राट लोकशाहिर महामानव डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जन्मभुमी व कार्यभुमी असणार्या सांगली जिल्ह्याला डॉ. अण्णाभाऊ साठे नगर असे नाव देण्यात यावे, जगत विख्यात साहित्य सम्राट लोकशाहिर महामानव डॉ. अण्णाभाऊ साठे यांची विकीपिडीया सत्य इतिहासावर आधारीत उच्च दर्जाची बणवण्यात यावी, मुंबई येथील गोल्ड मोहर मिल ही जागा डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी. या मागण्यासाठी केलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे दोन किलोमीटर अंतरावर राग लागली होती.