बीड, (रिपोर्टर)ः- इस्लाम धर्माच्या बाबतीत सातत्याने गैर वक्तव्य केले जात आहे. याच्या निषेधार्थ 23 सप्टेंबरला मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या जनजागृतीसाठी आज माजी खा.इम्त्यिाज जलील बीडमध्ये आलेले आहेत. त्यांनी समाजाची बैठक घेतली असुन या बैठकीला सुरूवात झाली. सदरील बैठकीला मोठ्या संख्येने मुस्लिम समाजासह विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून इस्लाम धर्म, मोहंमद पैगंबर आणि मुस्लिमांविरोधात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक समाजविघातक वक्तव्य करत आहेत. याच्या निषेधार्थ 23 सप्टेंबर रोजी मुंबई येथे सर्व पक्षीय आणि सर्व समाजाला सोबत घेवून माजी खा.इम्त्यिाज जलील हे तिरंगा रॅली आयोजित करत आहेत. या रॅलीच्या जनजागृतीसाठी आणि रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आज जलील बीडमध्ये आलेले आहेत. शहरातील गॅलेक्सी हॉल या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला धर्मगुरूसह सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सदरील बैठकीला दुपारी सुरूवात झाली होती.