गेवराई (रिपोर्टर): प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी अपशब्द काढणारे रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार म्हणतात, मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी बेताल वक्तव्ये करून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावणारे व सामाजिक शांतता भंग करणारे वक्तव्ये गेल्या काही दिवसांपासून रामगिरी महाराज करत असल्याचे निवेदन मुस्लिम बांधवांकडून प्राप्त झाले आहे. तरी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्ये करणार्यावर कडक कारवार्स करण्याचे निर्देश आपल्या स्तरावर देण्यात यावे. या प्रकरणात थेट भाजपा आमदारानेच मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.