बीड, (रिपोर्टर)ः- 20 किवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय गोर गरीबांच्यामुलावर अन्याय करणारा आहे तसेच शिक्षकांची संख्या कमी करणारा असुन राज्य सरकारने सदरील निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज प्राथमिक शाळेवरील सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर पावसामध्ये शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसापुर्वी राज्य सरकारने 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मुले शिक्षकांनापासून वंचित राहु शकतात. हा निर्णय अन्यायकारक आहे. याचा फटका शिक्षकांनाही बसणार आहे. राज्य सरकाने आपल्या निर्णयात बदल करावा या मागणीसाठी आज शिक्षक संघटनांनी प्राथमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भरपावसात शिक्षकांचा मोर्चा होता. या मोर्चामध्ये सर्व प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. आमच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेच्या बाबती कार्यरत शिक्षकांचे एक पद बंदकरण्याचा आणि कंत्राटी पध्दतीने सेवा निवृत्त आणि अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा, 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागु करण्यात यावी, शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरूस्ती करावी यासह इतर मागण्या शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आहेत.