• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

by गणेश सावंत
September 24, 2024
Reading Time: 1 min read
0
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले. अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं होतं? यासंदर्भातील सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे.

ठाणे पोलिसांनी काय म्हटलं?
पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पोलिसांच्या चकमकीत अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, “जी घटना घडली, त्या घटनेची प्राथमिक अशी आहे की, बदलापूर पोलीस ठाण्यात बदलापूर येथील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा गुन्हा अक्षय शिंदेवर दाखल होता. तसेच अक्षय शिंदेवर आणखी एक गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होता. अक्षय शिंदे याच्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अक्षय शिंदेच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन कायदेशीर रित्या सदर आरोपीचा ताबा तळोजा कारागृहामधून घेतला होता. त्यानंतर पोलीस अक्षय शिंदेला घेऊन जात असताना सदर आरोपीने पोलिसाची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

“यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवीन कायद्यानुसार, २६२, १३२, १०९, १२१ भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच जो आरोपी आहे तो मयत झालेला आहे. त्यासंदर्भात देखील अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालय करत आहे”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे.

बदलापूर प्रकरण नेमकं काय?
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदेने अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. तसेच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये संताप व्यक्त केला गेला होता. २० ऑगस्ट रोजी बदलापूर मधील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन करत जवळपास ९ तास मध्य रेल्वे वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली होती. दरम्यान, अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु होता.

“यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवीन कायद्यानुसार, २६२, १३२, १०९, १२१ भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच जो आरोपी आहे तो मयत झालेला आहे. त्यासंदर्भात देखील अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालय करत आहे”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे.

Previous Post

मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा पारा चढला; थेट तहसीलदाराची खुर्चीच पेटवली; मराठा कार्यकर्ते का भडकले?

Next Post

कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा;शाळा बंद ठेवून शिक्षकांचा भर पावसात मोर्चा

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
Next Post
कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा;शाळा बंद ठेवून शिक्षकांचा भर पावसात मोर्चा

कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा;शाळा बंद ठेवून शिक्षकांचा भर पावसात मोर्चा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?