बीड (रिपोर्टर): बीड येथील रेल्वे स्थानकाला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव द्या या प्रमुख मागणीसाठी आज आंबेडकरवादी अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता. यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बीड येथे होत असलेल्या रेल्वे स्थानकाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी होत आहे. यासाठी आज दलित संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाल होता. आंदोलनकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात घोषणा करत नाव देण्याची मागणी केली. यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
बीडच्या रेल्वेस्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाचव्या दिवशीही आंदोलन सुरुच
बीड (रिपोर्टर): बीड येथील होणार्या रेल्वेस्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपोषणकर्त्यांना अनेकांनी समर्थन दिले आहे.
बीड येथे होत असलेल्या रेल्वेस्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी अनुरथ सोपानराव वीर हे गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांना अनेकांनी आपले समर्थन दिले आहे.