मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण २२ उमेदवार जाहीर करण्यात आले. या शिवाय जे उमेदवार शिल्लक आहे त्यांची यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर केले जातील असे पाटील यांनी सांगितले.आज जाहीर केलेल्या यादीत बीड विधानसभा मतदार संघाचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे .पुन्हा एकदा विद्यमान आ संदीप क्षीरसागर यांना देण्यात आली आहे
शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत ६७ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. गंगापूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले सतीश चव्हाण यांना तर अजित पवार यांच्या पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना जयंत पाटलांनी राज्यातील जास्ती जास्त उमेदवारांचे समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाची तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता थेट जाहीर केली जाईल. आपण जर मुंबईत असलो तर पत्रकार परिषद घेऊन तिसरी यादी जाहीर केली जाईल असे पाटील म्हणाले.
दिंडोरी- सुनीता चारोसकर
फलटण- दीपक चव्हाण
माळशिरस- उत्तम जानकर
इचलकरंजी- मदन कारंडे
एरंडोल- सतीश पाटील
परंडा- राहुल मोटे
बीड- संदीप क्षीरसागर
येवला- माणिकराव शिंदे
गंगापूर- सतीश चव्हाण
खडकवासला- सचिन दोडके
पर्वती- अश्विनी कदम
उल्हासनगर- ओमी कलानी
शहापूर- पांडुरंग वरोरा
आर्वी- मयुरा काळे
बागलाण- दीपिका चव्हाण
सिन्नर- उदय सांगळे
नाशिक पूर्व- गणेश गीते
जुन्नर- सत्यजीत शेरकर
चंदगड- नंदिनीताई कुपेकर
आहिल्यानगर शहर- अभिषेक कळमकर
अकोले- अमित भांगरे
पिंपरी- सुलक्षणा शिलवंत
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर होत असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यांची तिसरी यादी जाहीर केली.