2019 च्या निवडणुकीत पुतणे संदिप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. बीड- स्व. केशरकाकू यांचा राजकीय वारसा चालवण्याचं काम माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. जयदत्त क्षीरसागर घरात थोरले असल्यामुळेच त्यांच्या माध्यमातून आज पर्यंत निवडणुका लढवल्या जात होत्या, पण क्षीरसागरांच्या घरात फुट पडली. पुतण्या संदीप क्षीरसागर हे काका जयदत्त क्षीरसागरांच्या विरोधात उभे राहिले. गत विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा अल्पमतांनी पराभव झाला. काकावर पुतण्याने मात केली. या निवडणुकीत दोन्ही पुतणे मैदानात उतरले. काका जयदत्त क्षीरसागर यांना कोणत्याच पक्षाने तिकीट दिलं नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. शेवटी त्यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. अपक्ष आपला निभाव लागणार नाही, हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली.
जयदत्त क्षीरसागर हे चाळीस वर्षापासून राजकारणात आहेत. पहिल्यांदाच त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आली आहे. दोन्ही पुतणे त्यांना वरचढ ठरल्याने त्यांच्या राजकारणाला घरघर लागली. स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या ह्यातीत जयदत्त क्षीरसागर यांनी विधिमंडळाच्या राजकरणाला सुरुवात केली होती. जयदत्त क्षीरसागर यांनी पहिली निवडणुकीत 1980 साली चौसाळ्यातून लढवली. मात्र पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर क्षीरसागरांनी 1990 ची निवडणुक लढवली. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यावेळी ते काँग्रेस आयमध्ये होते. 1995 ला क्षीरसागरांचा बीडमधून नवले यांनी पराभव केला होता. 1999 ला काँग्रेसमध्ये फुट पडून राष्ट्रवादीचा जन्म झाला होता. क्षीरसागर घराणं काँग्रेस ऐवजी पवारांच्या पाठीमागे उभा राहिलं. काकूसह जयदत्त क्षीरसागरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 1999 च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे चौसाळ्यातून लढले या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. 2004 ला ते पराभूत झाले. 2009, व 2014 या दोन्ही निवडणुकीत ते जिंकले. गेल्या निवडणुकीत मात्र त्यांच्या घरात फुट पडली. संदीप क्षीरसागर यांनी बंड केले. जयदत्त क्षीरसागर गत निवडणुक शिवसेनेच्या तिकीटावर लढले होते, तर संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून होते. पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. तेव्हा पासून जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकारणाला उतरता क्रमांक लागला. या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर एखाद्या प्रमुख पक्षाकडून तिकीट मिळवण्याचा जोरदार प्रयत्न करत होते पण त्यांना कोणत्या ही पक्षाने तिकीट दिलं. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. अपक्ष आपला निभाव लागणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं असावं म्हणुन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. चाळीस वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदा जयदत्त क्षीरसागरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वाईट वेळ आली. क्षीरसागरांचे दोन्ही पुतणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. पुतण्यांच्या उमेदवारीमुळे जयदत्त क्षीरसागरांच्या राजकारणाला घरघर लागली. धरसोडवृत्तीमुळे नुकसान जयदत्त क्षीरसागर यांनी अलीकडच्या काळात स्थिर राजकारण केलं नाही. त्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली. गेल्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे असतांना त्यांनी उघड,उघड पक्षाशी बंडखोरी केली. ऐन निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांना समर्थन दिले. त्यामुळे पक्षाचं आणि त्याचं फाटलं. विधानसभा निवडणुकीत आपल्याला मुंडे भगिणीकडून समर्थन मिळेल या आशेवर त्यांनी प्रितम मुंडे यांना समर्थन दिलं होतं. 2019 च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. ’भाजपाने आपलं काम केलं नसल्याचा आरोप’ क्षीरसागर समर्थकांनी केला होता. ’आम्ही लोकसभेला मदत केली, त्यांनी मात्र आम्हाला मदत केली नाही’ असं क्षीरसागरांचं म्हणणं होतं. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर शिवसेने सोबत ठाम राहिले नाही, ते अधून,मधून देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत होते, ही जवळीक शिवसेनेला आवडली नाही. फडणवीस यांना बीडमध्ये बोलावून त्यांच्या हस्ते बीड नगर पालिकेच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. जयदत्त क्षीरसागर भाजपाच्या नेत्या सोबत असल्याने ही बाब ठाकरे यांना खटकली असावी, त्यामुळे त्यांची पक्षातून बीडच्या जिल्हाप्रमुखांनी हाकलपट्टी केली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. कोणत्या पक्षात जावं याचे चिंतन ते सतत करत होते. कोणत्याच पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही, व कुठल्याही पक्षाने त्यांना जवळ केलं नाही. काही नेत्यांनी त्यांना आश्वासन दिले असतील, पण हे आश्वासन पुर्ण झाले तरच खरं! चार वेळा पराभव, चार वेळा विजय जयदत्त क्षीरसागरांनी आता पर्यंत आठ निवडणुका लढवल्या, त्यात त्यांचा चार वेळा पराभव आणि चार वेळा विजय झालेला आहे. विजयाच्या कार्यकाळात क्षीरसागर मंत्रीपदावर होते. क्षीरसागर गटात प्रवेश करणारे कार्यकर्ते कुठे जाणार? जयदत्त क्षीरसागर हे गेल्या काही महिन्यापासून विधानसभेची तयारी करत होते. कुठल्या ना, कुठल्या पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल अशी त्यांना अशा होती, पण त्यांच्या आशेवर पाणी पडलं. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या गटात अनेकांनी प्रवेश केला होता. क्षीरसागरांनी उमेदवारी मागे घेतल्याने प्रवेश करणारे कार्यकर्ते चांगलेच पेचात पडले, हे कार्यकर्ते कुठे जाणार? व त्यांचे समर्थन काय भुमिका घेणार?
क्षीरसागरांनी कुठून निवडणूक लढवली व त्यांच्या विरोधात कोण लढलं होतं
1980 – चौसाळा चांदमल राजमल लोढा- भा.रा.कॉ.(यु)-25963 क्षीरसागर जयदत्त सोनाजीराव- भा.रा.कॉ. आय-16512(पराभूत) 1990- चौसाळा जयदत्त क्षीरसागर-भा.रा.कॉ.-51189(विजयी) तुपे जनार्धन -शेकाप-26013 1995-बीड नवले सुरेश- शिवसेना-67732 जयदत्त क्षीरसागर-भा.रा.कॉ.-41041(पराभूत) 1999 चौसाळा क्षीरसागर जयदत्त-रा.कॉ.-44776(विजयी) आंधळे केशवराव यादवराव- भाजपा-42632 2004 चौसाळा आंधळे केशवराव -भाजपा-78439 जयदत्त क्षीरसागर-रा.कॉ.-75062(पराभूत) 2009 बीड जयदत्त क्षीरसागर- रा.कॉ.- 109163 (विजयी) धांडे सुनील-शिवसेना- 33246 2014 बीड क्षीरसागर जयदत्त- रा.कॉ.- 77134 (विजयी) विनायक मेटे- भाजपा- 71002