केज (रिपोर्टर): केज तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दोन चार दिवसाला चोरीची घटना घडू लागली. तालुक्यातील वरपगाव येथे चोरी झाली असून चोरट्याने हरभर्यासह इतर साहित्य असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा माल चोरून नेला आहे.
अरुण बापुसाहेब देशमुख यांच्या येथे चोरीची घटना घडली. चोरट्याने हरभरा, वायर, बोअरवेलचे जुने साहित्य यासह इतर असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. आपल्या इथे चोरी झाल्याचे देशमुख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0000
गळ्याला सत्तूर लावून ऑनलाईन पैसे टाकण्यास भाग पाडले, गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): गळ्याला सत्तूर लावून धमकी देत एकास ऑनलाईन पैसे टाकण्यास भाग पाडल्याचा प्रकार वडवणी येथे घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम गणेशचंद्र दास यांना अनोळखी चार व्यक्तीने गळ्याला सत्तूर लावून त्यांच्या मोबाईलमधून सोहेल हनखान पठाण याच्या खात्यावर ऑनलाईन 9 हजार 400 रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार दास यांनी सदरील पैसे ट्रान्सफर केले. या प्रकरणी दास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार आरोपींविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.