बीड(प्रतिनिधी)
प्रस्थापित घराणेशाहीला मुक्त करून बीड तालुक्याचा विकास करून राज्यात बीड मतदारसंघाची आणखी वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्धार केला आहे म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे,ना.बच्चू कडू आणि माजी खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बीड विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणार असून जनतेने मला मतदानरुपी आशिर्वाद द्यावेत असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रचार दौर्याच्या निमित्ताने महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांनी रविवार दि.10 नोव्हेंबर रोजी बीड तालुक्यातील विविध भागांचा दौरा करताना केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौर्यानिमित्त मौजे शिवनी, मौज, ब्रह्मगाव, ढेकणमोह, बकरवाडी, घाटसावळी, मैंदा येथे भेट देऊन शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, तरुण सहकारी, महिला भगिनींशी आणि गावकर्यांशी कुंडलिक खांडे यांनी संवाद साधला. यावेळी कुंडलिक खांडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त केले. बीड मतदारसंघातील विकासकामांचा लेखाजोखा मांडत येणार्या 20 नोव्हेंबर रोजी मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंती खांडे केली.घराणेशाही मुक्त बीड मतदार संघ करून बीडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण मला एकदा संधी द्या ही विनंती यावेळी आपल्या सर्वांना एकजूट होणे गरजेचे आहे. येणारा काळ हा नक्कीच कष्टकरी शेतकरी, शेतमजूर सामान्य जनता यांचा असेल. बीड तालुक्यामध्ये अत्यावश्यक लाईट, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या बाबींवर कुठलाच विकास झालेला नसून एवढंच नव्हे तर ज्यांनी आजी-माजी आमदारांनी अनेक वर्षे सत्ता भोगली त्यांच्याच गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही त्यांना शिक्षण देता आले नाही त्यांना आरोग्य देता आले नाही हे चित्र मला बदलायचे आहे. त्यासाठी तुमची समर्थ साथ मला द्या असे आवाहन खांडे यांनी केले.
चौकट
मागील चाळीस वर्षापासून बीड मतदारसंघाला अंधारात ढकलणार्या प्रस्थापिताना, तसेच मतदार संघातील भोळ्या भाबड्या जनतेला जातीजातीमध्ये धर्मामध्ये गुंतवून ठेवणार्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही. त्यासाठी सुजान नागरिकांनी, तरुण मतदारांनी मला संधी द्यावी असे खांडे म्हणाले.