बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील बहुतांशी राशन दुकानांवर दिला जाणारा राशनचा गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा देण्यात येत असल्याच्या तक्रारी आता गावागावातून येत आहेत. बीड तालुक्यातील अंजनवती येथील एका राशन दुकानामध्ये माती, कचरा यासह गुटख्याचे रेफरमिक्स गहू आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे सदरचा गहू थेट तहसीलदारांना देण्यात येणार असल्याचे आम आदमीचे अशोक येडे यांनी म्हटले आहे.
बीड तालुक्यातील अंजनवती येथील राशन दुकानांवरून अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू सर्वसामान्यांसाठी वाटप होताना दिसून आला. या गव्हामध्ये माती, कचरा, गुटख्याचे रेफर पहावयास मिळाले. सदरचा गहू खाण्यायोग्य नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. ज्याप्रमाणे हा निकृष्ट गहू अंजनवती येथे निदर्शनास आल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्ह्यघातील बहुतांशी राशन दुकानांवर अशाच प्रकारचा निकृष्ट गहू वाटप होत असल्याची ओरड आता होत आहे. सदरचा निकृष्ट गहू थेट तहसीलदारांना भेट देणार असल्याचे आम आदमी पार्टीचे अशोक येडे यांनी म्हटले आहे.