किल्लेधारुर( रिपोर्टर): धारूर तालुक्यातील हसनाबाद पासून ते राज्य मार्ग क्र. 232 पर्यंत शासनाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरी रस्ता मंजूर झालेला आहे व सदरील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून हा रस्ता काही शेतकर्यांनी जाणून बुजून अडवल्यामुळे त्या रस्त्याचे काम थांबले आहे हा रस्ता तात्काळ व्हावा यासाठी हसनाबाद ग्रामस्थांचे धारूर तहसीलदार व धारूर पोलीस प्रशासनास दिनांक 27 नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन कळविण्यात आले आहे तो तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याबाबतही या निवेदनात कळवले आहे.
अधिक माहिती अशी की हसनाबाद पासून धारूर – अंबाजोगाई राज्यमार्ग क्र. 232 ला जोडणारा अतिमहत्त्वाचा रस्ता असून हा रस्ता पूर्ण झाल्यास तेथील नागरिकांची वाहतुकीची सोय होणार असून सदरील रस्ता हा 90% पूर्ण झालेला असून 10% काम हे काही शेतकर्यांनी अडवलेले आहे त्यामुळे या रस्त्याचे काम बंद आहे हा रस्त्याचा प्रश्न येथील नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून हसनाबाद येथील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण होणे अत्यंत गरजेचे असून या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता सुरळीत करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार धारूर यांना हसनाबाद येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.दोन दिवसांच्या आत कार्यवाही नाही केली तर हसनाबाद येथील नागरिक पूर्णपणे कुटुंबासह व जनावरांसहित तहसील कार्यालय धारूर येथे दिनांक 29 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणास बसणार आहेत असा इशाराही हसनाबाद येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे निवेदन देते प्रसंगी नवनाथ नखाते,रमेश नखाते,मोतीराम लांडगे,सचिन नखाते,सत्यवान नखाते,अंगद नखाते ,शिवाजी सोळंके, परमेश्वर कोठुळे, दत्ता नखाते,यांच्यासह हसनाबाद येथील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.