नेकनूर (रिपोर्टर): बीड तालुक्यातील नेकनूर, सावंतवाडी, वैतागवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये गावाच्या विकासासाठी 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत लोखो रुपये चा निधी उपलब्ध झाला होता.या निधी मध्ये मोठ्या प्रमाणावर अपहरण करण्यात आला आहे. फक्त कागदावर कामे दाखवून लाखो रुपये उचलण्यात आलेली आहे या अनुषंगाने नेकनूर चे समाज सेवकांनी ग्रामपंचायत मध्ये या सर्व कामाची संपूर्ण माहिती महिती अधिकारा मध्ये माहिती मागवली होती . पण नेकनूर ग्रामपंचायत व ग्राम विकास अधिकारी शंकर वाघमारे हे माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.
विशेष म्हणजे नेकनूर ग्रामपंचायत मध्ये दिनांक 1/12/2024 ते दिनांक 20/92024 या कालावधीत 15 वित्त आयोगाच्या निधी किती प्राप्त झाला व कुठे खर्च करण्यात आला याची संपूर्ण माहिती व निधी मंजूर पत्र बँक स्टेटमेंट कामाचे अंदाजपत्र मोजमाप नोंद सही निधी वितरण कागदपत्र झाले यांची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी माहिती चा अधिकार दोन महिने पूर्वी नेकनूर ग्रामपंचायत मध्ये टाकण्यात आला होता . माहितीचे अधिकार अंतर्गत माहिती देण्यासाठी नेकनूर ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी शंकर वाघमारे व ग्राम पंचायत हे टाळाटाळ करीत आहे या माहितीच्या अधिकार ची मुदत 15 दिवसांची होती.पण ग्रामसेवक शंकर वाघमारे यांना वारंवार सांगुन सुध्दा महिती अधिकारांची दखल घेत नाही. वरिष्ठ अधिकारी यांनी या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी करावी अशी मागणी नेकनूर मध्ये होत आहे. लवकरच लवकर महिती अधिकार अंतर्गत माहिती देण्यात यावी नाही तर लवकर लवकर प्रथम अपील पंचायत समिती बीड माहिती अधिकारी यांच्याकडे करणार आहे.