परळी (रिपोर्टर): तपासणीसाठी गेलेल्या एका तरुणीचा चक्क डॉक्टरानेच विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार परळी शहरामध्ये घडला आहे. या प्रकरणातील दोषी डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहर कडकडीत बंद होते. बंदमध्ये सर्व व्यापार्यांसह नागरिकांनी सहभाग घेतल होता.
डॉ. दुष्यांत देशमुख याच्याकडे 21 वर्षीय तरुणी तपासणीसाठी गेली होती. या तरुणीचा डॉ. देशमुख याने विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेने परळी शहरामध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेतील पिडितेच्या फिर्यादीवरून डॉ. देशमुख विरुद्ध कलम 74, 75 (2), 79, 3 (1) (डब्ल्यू.) (1) (डब्ल्यू) (2) अनुसूचीत प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टरी पेशाला काळीमा फसणार्या डॉक्टरविरोदात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापार्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले होते.