बीड (रिपोर्टर): ईव्हीएम मशीनच्या विरोधात डॉ. बाबा आढाव यांचे पुणे येथे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला बीड येथील महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने समर्थन देण्यात आले असून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये अफलातून निकाल लागला आहे. निकालाबाबत संशय व्यक्त केला जात असून ईव्हीएम मशीन बंद करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते बाबा आढाव हे पुणे येथे उपोषण करत आहेत. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने समर्थन देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी राजकुमार घायाळ, शेरजमा खान पठाण, राजाभाऊ बादाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.









