छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन
बीड (रिपोर्टर): विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले यावर राज्यात कुणाचेही सरकार येवो, कुणीही मुख्यमंत्री होवो, आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच या भूमिकेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. तत्पूर्वी जरागें पाटील यांनी आज तुळजापूर, पंढरपूरचा दौरा करत तुळजाभवानीसह विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ते सकाळीच अंतरवली सराटूहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. शेकडो गाड्यांच्या ताफ्याने ते पुढे जात असून आज सकाळी बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत जरांगे पंढरपूरसाठी रवाना झाले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत समर्थक उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा अस्त्र उगारला आहे. राज्यात कुणाचीही सत्ता येवो, कुणीही मुख्यमंत्री होव याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आम्हाला आरक्षण हवाय, आणि त्या आरक्षणाचा लढा पुन्हा चालूच राहणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे जरांगेंनी म्हटले. तत्पूर्वी त्यांनी तुळजापूर येथे देवीचे दर्शन व पंढरपूर येथे विठू-रुक्माईचे दर्शन घेण्याचे ठरवले असून त्यानुसार ते तुळजापूर, पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांचा ताफा आज सकाळी बीडमध्यङे डेरेदाखल झाला. शहरात काही काळ या ताफ्यामुळे वाहतूक ठप्प झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि पुढे ते पंढरपूरसाठी रवाना झाले.