बीड (रिपोर्टर): बीडच्या स्थानीक गुन्हे शाखेकडून धाराशीव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस म्हणून नियुक्त असलेले पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची विनंतीवरून बीड जिल्ह्यात बदली झाली असून ते गेवराईचे ठाणेदार म्हणून नियुक्त झाले आहेत. या बदलीचे आदेश पोलीस अधिक्षक अरविंद साळवे व मुंबई महासंचालक यांच्या आदेशावरून झाली.
गेल्या पाच वर्षांपूर्वी बीडच्या स्थानीक गुन्हे शाखेत गणेश मुंडे कार्यरत होते. त्यांची धाराशीव जिल्ह्यात बदली झाली होती. त्यांनी नळदुर्ग महामार्ग पोलीस म्हणून काम केले. बीड जिल्ह्यात बदली करण्यात यावी, अशी विनंती मुंडे यांच्याकडून तेथील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. त्यानुसार 3 डिसेंबर रोजी गणेश मुंडे यांच्या बदलीचे आदेश आले आणि ते बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून नियुक्त झाले.