गेवराई (रिपोर्टर) पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विकास निधीतील येणार्या एकूण निधी पैकी पाच टक्के निधी हा अपंग बांधव यांच्यासाठी विविध योजना किंवा निधी खर्च करण्यात यावा असा शासन निर्णय असताना तालुक्यात कुठेच हा निधी खर्च केला जात नाही. याबाबत दि.10 ऑक्टोबर रोजी भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने निवेदन दिले होते. याबाबत गटविकास अधिकारी यांनी कुठलीच दखल न घेतल्याने भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता गिरी यांनी गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या अपंग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार महाराष्ट्रातील, पंचायत समिती यांना महाराष्ट्र शासनाच्या विकास निधीतील येणार्या एकूण निधी पैकी पाच टक्के निधी हा अपंग बांधव यांच्यासाठी विविध योजना किंवा निधी खर्च करण्यात यावा असा महाराष्ट्र शासनाचा जीआर असताना गेवराई पंचायत समिती कार्यालय यांना वेळोवेळी मागणी करून निवेदन देत पाठपुरावा केला मात्र याबाबत कुठलीच दखल होत नाही. गेवराई पंचायत समिती एक एप्रिल 2022 ते मार्च 2024 पर्यंत गेवराई तालुक्यातील किती अपंग व्यक्तींना निधी वाटप करण्यात आला व कोणत्या स्वरूपात देण्यात आला याची सविस्तर माहिती देण्यात यावी व 2023-24 चा अपंग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी देण्यात यावा या मागण्यासाठी भाजपा दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता गिरी यांनी गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.














