सुनवणी दरम्यान कडेकोट पोलीस बदोबस्त
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरातील बालेपीर भागात राहणार्या शिक्षक साजेद अली यांचा निघूणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी 18 आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण बीड येथील विशेष मोक्का न्यायालयात सुरू होते. आज या प्रकरणाचा निकाल होता. न्यायालयाने 18 पैकी 14 आरोपींना दोषी ठरविले असून 3 आरोपींना निर्दोष ठरविलेले आहे. दोषींना सोमवारी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. साजेद अली खुन प्रकरणाचा आज निकाल असल्याने जिल्हा न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आरोपी
ीड शहरातील बालेपीर भागात राहणारे सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली (वय 38) यांची 5 डिसेंबर रोजी धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुजर खान उर्फ अन्वर खान मिर्झा खान, सरफराज काझी, फैज मोहम्मद खान उर्फ पापा भाई, सय्यद नुर उर्फ मिनाज, मुजी खान पठाण, सय्यद नासेर सय्यद नुर, सय्यद शाहरूख सय्यद नुर, शेख उबेद शेख बाबू, शेख सरफराज, इम्रान पठाण, शेख शाहबाद शेख कलिम, शेख अमर शेख अख्बर, शेख बाबर युसूफ, आवेज काझी, शेख इम्रान उर्फ काला, शेख मजर उर्फ हमसफर, बाबर खान गुल मोहंमद खान पठाण, शेख वसीम शेख बदरोद्दीन यांच्या विरूध्द शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण बीड येथील विशेष मोक्का न्यायालयात सुरू होते. या प्रकरणाचा आज निकाल होता. न्यायालयाने 14 आरोपींना दोषी ठरविले असून 3 जणांना निर्दोष मुक्त केलेले आहे. दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. दोषींना सोमवारी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. साजेदअली खुन प्रकरणाचा निकाल असल्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी स्वतःडीवायएसपी गोल्डे, चार पीआय आणि 150 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड.अजय तांदळे हे काम पाहत आहेत.