बीड (रिपोर्टर): बालेपीर भागातील शिक्षक साजेद अली यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील 14 आरोपींना मोक्का न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाल्यानंतर या प्रकरणातील दोषींना 13 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
बालेपीर भागातील शिक्षक सय्यद साजेद अली यांचा पाच वर्षांपूर्वी बालेपीर भागात निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.आर. पाटील यांनी 14 आरोपींना दोषी ठरवलेले आहे. आज दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणातील दोषींना 13 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. अजय तांदळे हे काम पहात आहेत. आजच्या युक्तीवादामध्ये अॅड. अजय तांदळे यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, दोषी आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच त्यांना दंडही ठोठावण्यात यावा, दंडाची रक्कम पिडिताच्या परिवाराला द्यावी, अशी मागणी तांदळे यांनी केली आहे.