अंबाजोगाई (रिपोर्टर): केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात आकाचे आका असे म्हणत भा ज पा आमदार सुरेश धस हे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री ना धनंजय मुंडे यांचे नाव विनाकारण बदनाम करत आहेत त्यांनी हि बदनामी तात्काळ थाबवावी व मुख्यमंत्री यांनी तात्काळ समज द्यावी नसता जस्या तसे उत्तर दिले जाईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष राजेश्व्रर चव्हाण आज अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले
आज सकाळी अकरा वाजता शासकीय विश्राम ग्रह येथे राष्ट्रवादी कॉग्रेस च्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांच्या जे कोणी मारे करी असतील त्यांना रस्त्यावर फाशी दिली गेली पाहिजे सध्या या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे एस आई टी तसेच सि आय डी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत व मी जर तपासात दोषी दिसलो तर मी राजीनामा देण्यास तयार आहे अशी भूमिका राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची असून सुद्धा राजकीय द्वेषा पोटी आमदार सुरेश धस विनाकारण दररोज त्यांचे नाव बदनाम करत असून हि बदनामी त्यांनी थांबवावी अन्यथा जश्यास तसे उत्तर दिले जाईल असे ते म्हणाले या पत्रकार परिषदेस राजेशवर चव्हाण माजी आमदार संजय दौड दत्ता पाटील राजाभाऊ औताडे राजपाल लोमटे तानाजी शिंदे विलास सोनावणे आदी उपस्थित होते.