बीड, (रिपोर्टर)ः- गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असणार्या गुंडावर एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. आतपर्यंत अनेक गुंडाविरोधात अशा पध्दतीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. अंबाजोगाई हद्दीतील एका गुंडाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
मोहन दौलत मुंडे (रा.क्रांतीनगर अंबाजोगाई) याच्या विरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदरील इसम हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचा असल्याने परळी व अंबाजोगाई पोलिसांनी त्याच्यावर बर्याच दिवसापासून करडी नजर ठेवली होती तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधरावे म्हणून या पुर्वी 110 प्रमाणे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली हेाती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा गुन्हे करू लागल्याने त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करून त्याला हार्सुलच्या कारागृहामध्ये पाठविण्यात आले. सदरील ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, चेतना तिडके, अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली शेख उस्मान, मजहर सय्यद, शेख, पवार, सुनिल अन्नमवार, सिध्देश्वर मुरकुटे, तुळशीराम जगताप, अभिमन्यु अवताडे, युनूस बागवान, राहुल शिंदे, कैलास ठोंबरे, चंद्रसेन राऊत, बिभिषण चव्हाण यांनी केली आहे.











