बीड (रिपोर्टर) बीड शहरातील बहुतांश रस्ते अत्यंत खराब असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले. चिखल तुडवत नागरिकांना कशीबशी वाट काढावी लागते. बीड शहराचा विकास झाल्याचा नुसताच गवगवा केला जात आहे. खराब रस्त्याच्या निषेधार्थ आज न.प. कार्यालयात काही समाजसेवकांनी ‘लॉलीपॉप’ आंदोलन केले.
बीड शहरामधील अनेक रस्त्यांची अवस्था वाईट आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खराब रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले. चिखल तुडवत नागरिकांना कशीबशी वाट काढावी लागते. चिखलामध्ये लहान मुलांचे बेहाल होऊ लागले. रस्ते दुरुस्त करण्याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. बीड न.प. फक्त विकासाचा गवगवा करत आलेले आहे. न.प.ने बीडकरांची दिशाभूल केली असून याच्या निषेधार्थ न.प. कार्यालयात आज लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले. या वेळी गणेश ढवळे, शेख युनुस, सतीश गर्जे, हमीद पठाण, सय्यद आबेद, शेख मुबीन, मनोज जाधव, उमेश ढाकणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.