बीड (रिपोर्टर): मारहाण प्रकरणातील आरोपीविरोधात पेठ बीड पोलीस कठोर कारवाई करत नाहीत. पोलीस आणि आरोपी यांच्यामध्ये संगनमत असल्याचा आरोप करत पवार कुटुंबियांनी आज मोंढा रोड येथील बिंदुसरा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
सावित्री नागेश पवार (रा. वत्तारवेस नाळवंडी रोड बीड) यांच्या पतीस 24 मार्च 2024 रोजी मारहाण करण्यात आली होती. त्यांना तलवारीने मारण्यात आले होते. त्यांच्या पतीसह इतरांना देखील मारहाण झाली होती. या मारहाण प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात बाबू पवार, रामदास पवार, विठ्ठल पवार, बाळू पवार यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात पेठ बीड पोलीस आरोपींशी संगनमत करत असून त्यांच्या विरोदात कठोर कारवाई करत नसल्याचा आरोप सावित्री पवार यांचा आहे. आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी सावित्री पवार यांच्या कुटुंबियांनी मोंढा रोड येथील बिंदुसरा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.