बीड (रिपोर्टर) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढलू लागली आहे. बुधवारी आरोग्य विभागाला 466 संशयितांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर 461 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अंबाजोगाई, गेवराई, केज, परळी, शिरूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.