तहसिलदारांनी कर्मचार्यांची संख्या वाढवावी
केज (रिपोर्टर)ः- श्रावणबाळ, संजयगांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्याना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्यासाठी केज तहसिल कार्यालयात सकाळपासूनच वयोवृध्दांची गर्दी असते. तहसिलमध्ये फक्त दोनच पि.सी. आणि दोनच कर्मचारी असल्याने केवायसी करण्यास वेळ लागू लागला. केवायसी करण्यासाठी जास्त वेळ लागू नये यासाठी पि.सी. व कर्मचार्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे.

केज तालुक्यामध्ये शेकडो श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे. या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होत असतात. सदरील लाभार्थ्यांची केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. ही केवायसी तहसिल कार्यालयामध्ये केली जात आहे. केवायसी करुन घेण्यासाठी लाभार्थी सकाळपासूनच कार्यालयात ठाण मांडुन असतात. दिवसभर थांबूनही अनेकांची केवायसी होत नाही. दोन पि.सी. आणि दोनच कर्मचारी असल्याने केवायसी करण्यास वेळ लागत आहे. पि.सी. व कर्मचार्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केली जात आहे.