बीड, (रिपोर्टर)ः- शहरातील विविध भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नगर पालिकेच्या अनेक घंटागाड्या आहेत. त्या वेळेवर त्या त्या वार्डात येत नसल्याने जागोजागी घाण पसरली आता काही घंटागाड्या चालकाने कचरा नेण्यासाठी पैसे घेण्यास सुरूवात केली आहे. अशा घंटागाड्या चालकाविरोधात नगर पालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले. न.पच्या स्वच्छता विभागाकडून वेळोवेळी घाण साफ केली जात नाही. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आणण्यात आल्या असल्या तरी या गाड्या मध्यंतरी बंद होत्या. आता या गाड्या काही ठिकाणी सुरू आहेत. कचरा घंटागाड्यात टाकण्यासाठी चालक नागरीकांकडून पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. अशा चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हासंघटक नितीन धांडे यांनी केली आहे.