• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home कटाक्ष

मराठवाड्याची ‘पत’ कबरीत

by गणेश सावंत
March 18, 2025
Reading Time: 1 min read
0
मराठवाड्याची ‘पत’ कबरीत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
गर्जा महाराष्ट्राचा दर्जा अधिक मजबूत व्हावा म्हणून इ.स. 1960 साली मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट सामील झाला. तत्कालीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा मराठवाड्याला झुकते माप दिले जाईल, असा शब्द दिला होता. जोपर्यंत यशवंतराव मुख्यमंत्री होते तोपर्यंत त्यांचे मराठवाड्याकडे लक्ष होते. मात्र जेव्हा अखंड हिंदुस्तानावर चीनने हल्ला केला तेव्हा त्या हिमालयाच्या मदतीला आमचा सह्याद्री धावून गेला आणि यशवंतराव देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यानंतर मारुतराव कंन्नमवार  यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली, त्यांचेही अकाली निधन झाले आणि वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. वसंतरावांचा पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला विरोध असताना शंकरराव चव्हाणांनी भगिरथी प्रयत्नांतून जायकवाडीचा प्रकल्प पुर्ण केला. त्यामुळे ते अडीच लाखपेक्षा अधिक क्षेत्र आज ओलिताखाली आहे. त्यानंतर


पुढे मराठवाड्याचे काय?
हा सवाल आणि पन्नास वर्षाचा इतिहास सांगण्यामागचे कारणच एवढे की, आज मराठवाड्याचे काय? या प्रश्‍ना व्यतिरिक्त उत्तर ते काहीच मिळणार नाही. हो, इथे आमदार, खासदारांची मालमत्ता डोळे दिपवणारी असेल, इथे त्यांच्या दोन-चार बगलबच्च्यांची मालमत्ता ही एखाद्या उद्योग धंदे करणार्‍या अदानी-अंबानीलाही लाजवेल, इथे लाचखोर अधिकार्‍यांची मालमत्ता ही कित्येक कोटींच्या घरात असेल, परंतु जेव्हा मराठवाड्याच्या दरडोई उत्पन्नाचा आलेख समोर येतो तेव्हा मराठवाड्यातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न पाहितले तर आजच्या लोकप्रतिनिधींना नेते म्हणवून घेणार्‍यांना लाज कशी वाटत नाही? असेच आहे.


मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न
विधीमंडळात सादर झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे हे खालच्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न 2 लाख 78 हजार 681 रुपये एवढे आहे. तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न हे 1 लाख 88 हजार 892 रुपये एवढे आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे असले तरी आर्थिक पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा ग्रहीत धरण्यात आला आहे. तिकडे ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्रित उत्पन्न यात दाखवण्यात आले आहेत. मराठवाड्यातले जालना, बीड, परभणी, हिंगोली यांचे सरासरी दरडोई उत्पन्न हे सर्वात कमी असल्याचे या अहवालातून दिसून येते. जालना 1 लाख 78 हजार 329, बीड 1 लाख 77 हजार 240, परभणी 1 लाख 75 हजार 758 तर हिंगोली 1 लाख 47 हजार 333 एवढे आहे. यातून मराठवाडा आर्थिकदृष्ट्या किती मागास होत चालल्याचे स्पष्ट होते. सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढवून त्यांची पत वाढवण्यापेक्षा इथे


‘कबरी’ची पत
वाढवण्याचे धंदे सुरू झालेत. गेल्या दोन वर्षांपासून मराठवाडा प्रचंड अस्थिर असल्याचे दिसून येते. कधी आरक्षणाच्या मुद्यावर, कधी जातीच्या मुद्यावर तर कधी धर्माच्या मुद्यावर मराठवाड्यातले काही जिल्हे प्रचंड प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसते. प्रामुख्याने बीड, जालना, उस्मानाबाद, संभाजीनगरया जिल्ह्यांना जातीची आणि धर्माची नशा अधिकच चढल्याचे वारंवार घडणार्‍या घटनाक्रमावरून दिसते. अशा स्थितीमध्ये जातीवादाचे उच्चाटन करण्यासाठी आणि धर्मांध लोकांच्या मुसक्या बांधण्यासाठी शासन-प्रशासन व्यवस्थेने प्रबोधनासह कायद्याचा बडगा दाखवणे नितांत गरजेचं असतं, मात्र इथे विधीमंडळात काम करणारेच जेव्हा धर्म आणि जातीला अनन्यसाधारण महत्व देत इतिहासाच्या पानातून भविष्याचा वेध घेण्यापेक्षा रक्ताळलेल्या इतिहासाच्या खांद्यावर बंदूक ठेवून इथं रक्त-मांसाचा चिखल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथेच सर्वसामान्यांचे दरडोई उत्पन्न आणि त्या माणसाची पत कबरीत गाढली जाते.


पत गाढणारे अन्
निर्माण करणारे कोण?
हा प्रश्‍न वाचून खरंतर प्रत्येकाला हसू येईल. आम्हीही हे लिहिताना हसतो! कारण पत गाढणारे इथे पत निर्माण करतात आणि ज्यांच्या मनगटात पत निर्माण करण्याची क्षमता आहे ते जातीपातीच्या आणि धर्माच्या नावावर धर्मांध होत स्वत:ची पत गाढून टाकतात. आलय का लक्षात, जेव्हा केव्हा जातीय दंगली भडकतात, धार्मिक दंगली भडकतात तेव्हा कुठल्याच पैश्यावाल्याच्या लेकराला दगड लागलेला दिसत नाही. जे ‘गर्व से कहो’ म्हणतात, त्यांच्या घरातला एकही पोरगं रस्त्यावर हातात दगड घेऊन नसतो. ते ‘बिचारे’ देश-विदेशात शिक्षण घेत असतात, आपलं भविष्य घडवित असतात, आम्ही मात्र ‘जय भवानी, अल्लाहू अकबर’ च्या घोषणा देत रस्त्यावर उतरतोत. आता तरी लक्षात घ्या आपलं लक्ष्य हे आपलं दरडोई उत्पन्न वाढवणारा असावं, आपली पत वाढवणं असावं. धर्म अभिमान, स्वाभिमान हा प्रत्येकाला असतोच, तो असायलाच हवा. स्वत:च्या धर्माबरोबर प्रत्येकाने परधर्माचाही आदर करावा, हेच गीता, कुरआन आणि बायबल जगातले सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ सांगत आले आहेत. एका वक्यात सांगायचे झाल्यास तर गिता कहेती है त्याग करो, कुरआन कहेता है यकीन करो, बायबल कहेता है प्यार करो, जिथे त्याग, विश्‍वास आणि प्रेम असतो तिथे पत असते. 

Previous Post

मौलाना आझादची शिदोरी, 150 व्यवसायिकांना 4 कोटी 80 लाख तर 22 विद्यार्थ्यांना 1 कोटी 98 लाखांचे कर्जाचे वितरण;संचालक शेख तय्यब यांच्या कामाचा धडाका सुरू

Next Post

घंटागाडीचे चालक नागरिकांकडून घेवू लागले पैसे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – हा कुठला त्याग ?

by गणेश सावंत
May 11, 2026
अग्रलेख

कटाक्ष – हा कुठला त्याग ?

by गणेश सावंत
May 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -सत्ताकक्षातले पांढरपेशी दरोडेखोर

by गणेश सावंत
May 8, 2026
कटाक्ष

कटाक्ष -सत्ताकक्षातले पांढरपेशी दरोडेखोर

by गणेश सावंत
May 8, 2026
कटाक्ष

कटाक्ष -संस्कार हरवले, स्क्रीन जिंकली

by गणेश सावंत
March 28, 2026
Next Post
घंटागाडीचे चालक नागरिकांकडून घेवू लागले पैसे

घंटागाडीचे चालक नागरिकांकडून घेवू लागले पैसे

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?