बीड, (रिपोर्टर) ः ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान 20 मार्च ते 24 मार्च 2025 या कालावधीमध्ये आयोजित केले आहे. हे विक्री प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत या वेळात स्वयंसहाय्यता बचतगटाच्या वतीने उत्पादित वस्तुंची विक्री करण्यात येणार आहे. हा महाउत्सव गुढीपाढवा, ईदबाजार त्याअनुषंगाने आहे. हे जिल्हास्तरीय प्रदर्शन जिल्हा परिषद प्रांगणात बचतगटाचे स्टॉल लावून विक्री प्रदर्शन पार पडणार आहे.
यामध्ये ग्रामीण भागातील मसाले, खाद्यपदार्थ, हस्तकला, ग्रामीण कलाकुसर, ज्वेलरी तसेच शाकाहरी व मासाहरी जेवणाची मेजवाणी यामध्ये असणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रवेश हा विनामुल्य आहे. याचे उदघाटन आज मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सदस्य, बचतगटातील महिला व इतर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रकल्प संचालिका संगितादेवी पाटील यांनी केले आहे.