आतापर्यंत 100 सायलेंसर केले जप्त
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरासह ग्रामीण भागातील अनेक दुचाकी वाहनधारकांचे सायलेंसर मोठ्या आवाजाचे असतात. यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरणार्या वाहन धारकांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंंत 100 सायलेंसर जप्त करण्यात आलेले आहे. वाहन धारकांनी नियमांचे पालन करावे नसता त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा सचिन पांडकर यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून बीड शहरासह ग्रामीण भागातील दुचाकीस्वार आपल्या गाड्यांना मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरतात. विशेष करून बुलेटला असे सायलेंसर असते. या सायलेंसरमुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. वाहतुक पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या सायलेंसरवर कारवाई करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत 100 सायलेंस जप्त करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे. वाहन धारकांनी आपल्या गाड्यांना मोठ्या आवाजाचे सायलेंसर लावू नये लावल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी दिला आहे.









