आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार,
मुंबई, (रिपोर्टर)ः- पाच वर्षांपूर्वी दिशा सालियान हिचा अकस्मात मृत्यू झाला, हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचीही त्यांची मागणी आहे. पाच वर्षापुर्वी हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधक आणि सत्ताधार्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.या प्रकरणी विधान भवनाबाहेर सत्ताधार्यांनीच दबाव आणला कशाला, न्याय हवा दिशाला असे लिहिलेले फलक हातात धरून आंदोलन केले.
आदित्य ठाकरे यांच्यावर केस दाखल करून त्यांना अचक करून चौकशी करावी अशी सत्ताधार्यांची मागणी आहे. तर औरंगजेबाचे प्रकरण अंगावर शेकल्याने त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. दिशा सालियन प्रकरणावरू आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्ययाप्रकरणी दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली.
याच मुद्यावरून शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का, दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी, असे कायंदे म्हणाल्या. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्ष न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हीचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉ. कायंदे यांनी सांगितलं.
दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचेही नाव असून त्यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. याचाच दाखल कायंदे यांनी दिला. ‘ माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून त्या तरुणीच्या वडिलांवर दबाव आणला, त्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, सतत खोटी माहिती त्यांना का देण्यात आली, जे पुरावे देण्यात आले तेच खरे आहेत हे त्यांनी मानावं यासाठी त्यांना नजर कैदेत ठेवलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर किशोरी पेडणेकर यांना द्यावी लागतील’ अशी मागणी कायंदे यांनी केली.