पोलीस कारवाई का करत नाहीत?
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश त्या त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहेत. कुक्कडगाव, चव्हाण वाडी या ठिकाणी अनाधिकृत देशी दारूची विक्री होत आहे. दारू विकणार्या लोकांविरोधात पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल उपस्थित होवू लागला. गावातच दारू मिळू लागल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त होवू लागले. तरूणांना दारूचे व्यसन लागू लागले. गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी पोलिसांनी ठोस भुमिका घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसापासून कुक्कडगाव, चव्हाणवाडी याठिकाणी दारूची विक्री होवू लागली. दारूमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होवू लागले. गावातील तरूणांना दारूचे व्यसन जडू लागले. दारू विक्रेत्यास पोलिसांचे अभय असल्याचे दिसून येत आहे. अभय नसते तर या दारू विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यात आली असती. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सर्व ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत तरीही कुक्कडगाव या ठिकाणी दारूची विक्री हेात आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून दारू विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकर्यांच्या वतीने केली जात आहे.