वडवणी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील शेतकरी आपल्या स्व;ताच्या शेतात बाजरी काढण्यासाठी घर बंद करून गेले असता दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचे गेटचे व घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील पेटीमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले असून तब्बल 2 लाख 90 हजार रुपायाच्या किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. हि घटना दि.31 मार्चच्या रोजी घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी तालुक्यातील पुसरा येथील शेतकरी नारायण मारोती नाईकवाडे वय 64 वर्ष हे आपल्या पत्नीसह शेतात बाजरी काढण्यासाठी दि.31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गेले होते. दिवसभर शेतात काम करुन घरी परत आल्यावर घराचे गेटचे कुलुप तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले नंतर घरात आल्यानंतर घराचे देखील कुलूप तुटलेले होते व घरातील पत्राच्या पेटीमध्ये साहित्य खाली जमिनीवर फेकण्यात आलेले होते. हे पाहून शेतकर्यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली आहे त्यांनी तात्काळ आरडाओरड करत शेजार्यांना बोलवले व तात्काळ वडवणी पोलिसांना माहिती दिली आणि वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसट, पोलीस नाईक विलास खरात, पो.काँ. इरमले, यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ पंचनामा केला. व या चोरीच्या घटनेमध्ये पत्राच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याचे निदर्शनास आले यामध्ये एकूण 209000 रु किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 331 (3)305, 331(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक अमन सिरसट यांनी तात्काळ श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले असून श्वान पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास स.पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड करत आहे. सदरील भर दिवसा चोरीच्या घटनेने पुसरा गावासह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तपास सुरु आहे – पीएसआय राठोड
सदरील प्रकरणाचा तपासासाठी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. परंतु यामध्ये काही सुगाव लागलेला नाही. याबाबत इतरत्र बाबी लक्षात घेता विचारपुस करत या घटनेचा तपास सुरु आहे.अशी प्रतिक्रिया तपास अधिकारी तथा पीएसआय राजू राठोड यांनी साजं.दै. रिपोर्टरला प्रतिक्रिया दिली आहे.