बीड, (रिपोर्टर)ः- राज्याचे कृषीमंत्री कोकाटे यांनी रात्री पुन्हा एकदा शेतकर्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. पिककर्ज घेवून शेतकरी आपल्या मुलीचे लग्न करतात, साखरपुडा करतात अशा पध्दतीचे बेताल वक्तव्य केल्याने शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषीमंत्र्याचा जाहिर निषेध करत त्यांचे फोटो जाळून निषेध करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष गायकेंसह आदींची उपस्थिती होती.
रात्री नाशिक येथे नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पिककर्जाच्या माफीबाबत विचारणा केली असता कृषीमंत्री म्हणाले की, पिककर्जाचे पैसे घेवून शेतकरी आपल्या मुलीचे लग्न करतात, साखरपुडे करतात मग शेतकर्यांना कर्जमाफी कशासाठी द्यायची अशा पध्दतीचे बेतात वक्तव्य करून कोकाटे यांनी शेतकर्यांचा अवमान केला. कोकाटे यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केलाजावू लागला. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु गायके यांनी सौदांना येथे कोकाटे यांचे फोटो जाळले. यावेळी चंद्रशेखर जाधव, अशोक गायके, गोरख गायके, गोपीनाथ कथले, सुलक्षण गायके, प्रविण कतले. अंकुश गायके, समाधान कतले, श्रीराम गायके यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.