बीड, (रिपोर्टर)ः-नगर रोडवर असलेल्या चंपावती प्राथमिक शाळेमध्ये जावून तेथील मुलींकडे पाहुन एका नराधमाने अश्लिल कृत्य केले. हाप्रकार शाळेच्या शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याल पकडून बेदम चोप देण्यात आला. पालकांसह इतर नागरीकांनीही त्याला चांगलेच धुतले ही घटना आज सकाळी शाळेच्या दुसर्या मजल्यावर घडली. शिक्षकांनी त्यास पोलीसांच्या स्वाधिन केले असून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीमंत आश्रुबा टाकसाह (रा.हिवरसिंगा ता.शिरूर) हा नराधम आज सकाळी नगर रोडवर असलेल्या चंपावती प्राथमिक शाळेच्या दुसर्या मजल्यावर गेला. तेथील चौथीच्या वर्गासमोर जावून त्याने मुलींकडे पाहुन अश्लिल कृत्य केले हा प्रकार काही शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला पकडून बेदम चोप देण्यात आला ही माहिती पालकांसह नागरीकांना झाल्यानंतर त्यांनीही त्यास चांगलेच तुडवले. या घटनेने शाळा परिसरात एकच खळबळ उडाली. शिक्षकाने त्यास शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. या प्रकरणी शाळा प्रशासनाच्या वतीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. नराधम श्रीमंत टाकसाळ यांच्या विरोधात कलम 75/79 सह कलम 12 पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.