गेवराई पोलिसांची कारवाई, तीन ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल
गेवराई, (रिपोर्टर)ः- राक्षसभुवन हद्दीतील गोदावरील नदीपात्रातून अनाधिकृत वाळूचा उपसा सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे वाळू घेवून जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी तीन ट्रॅक्टर ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोदावरी नदी पात्रातील राक्षसभुवन हद्दीमधून ट्रॅक्टरद्वारे वाळू नेली जात होती. सदरील ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रॅक्टरसह वाळू 5 लाख 56 हजारांची जप्त करण्यात आली. यात पहिल्या ट्रॅक्टरचा इंजि.नं. एनएनएम 6 सीएईओओ 32 दुसरा टॅ्रक्टरचा इंजि.नं एनएनएच 2 डब्ल्यूबीई 0281 हाही जप्त करण्यात आला आहे. वाळूसह इंजन असा 8 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. तिसर्या ट्रॅक्टरचा इंजि.नं.एनएनएम 6 सीएईओओ 65 असा आहे. वाळूसह ट्रॅक्टरची किंमत 5 लाख 56 हजार रूपये आहे. सदरील हे तिन्ही गुन्हे गेवराई पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत.